या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी पत्र लेखन (Marathi Letter Writing) आणि पत्र लेखांचे नमुने.
या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी पत्र लेखन शिकायला मिडेल ज्या मध्ये अनोपचारिक पत्र लेखन (Informal Letter Writing in Marathi) आणि ओपचारिक पत्र लेखन (Formal Letter Writing in Marathi) दोघांचे नमुने पण तुम्हाला बघायला मिडेल.
पत्रलेखनाचे प्रकार
आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली आढळत नाही.
अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter in Marathi
1. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र.
२३२, गांधी नगर,
मुंबई
अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार््याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.
औपचारिक पत्राचा आराखडा | Formal Letter Format in Marathi
[ पत्रलेखकाचे स्वतःचे नाव
पत्रलेखकाचा स्वतःचा
पत्ता व नंबर.]
प्रति,
[ स्वीकार करणाऱ्याचे नाव,
पदाचे नाव, संस्तेचा पत्ता
इत्यादी तपशील येथे लिहावी.]
विषय : [पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]
संदर्भ : [ पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]
[ येथे पात्राच्या मजकुराला सुरुवात होते. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]
ओपचारिक पत्रांचे स्थूलमानाने काही उपप्रकार मानले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत :
1. वनमहोत्सवात वृक्षरोपण करण्यासाठी रोपे मागवणारे पत्र.
रजनी जाधव
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
पुणे-४११ ११५.
दि. २५ जुलै २०२१
विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.
पुढील महिन्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत, असे कळले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत; त्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
आमच्या शाळेला सुमारे दोनशे रोपे हवी आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू हेपत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे. तसदीबद्दल क्षमस्व.
आपली कृपाभिलाषी
रजनी जाधव
विद्यार्थी प्रतिनिधी
2. शाळेच्या कार्यालयाकरिता स्टेशनरी सामानाची मागणी करणारे पत्र.(शालेय वस्तू मागणी पत्र)
आदर्श विद्यालय सांगली -४१६ ४१६.प्रति,
मे. भरत स्टेशनरी मार्ट,
जोगेश्वरी चौक,
पुणे-४११ ००२.
विषय : स्टेशनरी सामानाची मागणी.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या शाळेसाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी मालाची पुढील यादीनुसार मागणी या पत्रादवारे करीत आहे. कृपया सर्व साहित्य त्वरित पाठवावे, म्हणजे शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ते आमच्या हाती येईल व गैरसोय होणार नाही.
मालाचे बिलही सोबत पाठवावे, म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल.
SR | ब्स्तू | संख्या |
---|---|---|
1 | आखीव कागद | २ रीम |
2 | कोरे कागद | १ रीम |
3 | शिसपेन्सिली | ४ डझन |
4 | रंगीत पेन्सिली | १ डझन |
5 | पिन्स | १ डझन पाकिटे |
6 | शाईचे खोडरबर | ४ डझन |
1. दहावीच्या वर्गाने तिळगूळ समारंभ आयोजित केला आहे, त्यास उपस्थित राहण्याबद्दल वर्गप्रतिनिधी, गुरुजनांना विनंतिपत्र लिहीत आहे.
वर्गप्रतिनिधी, १० वी अ, हुतात्मा चापेकर विद्यालय, पुणे-४११ ००३. दि. १४ जानेवारी २०२१ माननीय मुख्याध्यापक व अन्य शिक्षक, हुतात्मा चापेकर विद्यालय, पुणे-४११ ००३. विषय : तिळगूळ समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती. सादर नमस्कार.आम्ही दहावी 'अ'च्या सर्व विद्यार्थ्यांनी आज आमच्या वर्गात तिळगूळ समारंभ साजरा करण्याचे ठरवले आहे. यंदाचे वर्ष हे शाळेतील आमचे शेवटचे वर्ष आहे, म्हणून आम्ही हा समारंभ आयोजित केला आहे.
या समारंभासाठी आपण आमच्या वर्गात कृपया ठीक चार वाजता उपस्थित राहावे आणि आम्हांला शुभेच्छा द्याव्यात, अशी आमची इच्छा आहे. माननीय मुख्याध्यापक श्री. कुळकर्णी सर अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत.
तरी आपण आमचे निमंत्रण स्वीकारून आमचा तिळगूळ समारंभ गोड करून घेण्यास यावे. आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत आहोत.
आपला नम्र विद्यार्थी, वर्गप्रतिनिधी2. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी निर्मलग्राम पंचक्रोशीतील डॉक्टरांच्या संघटनेने करावी, अशी त्या संघटनेला विनंती करणारे पत्र लिहा.
विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यादेवी प्रशाला, सांगली - ४१६ ३०१. दि. १९ ऑगस्ट २०२१ डॉ. बाळ काऱ्हेरे निर्मलग्राम आरोग्य वाहिनी, निर्मलग्राम, सांगली - ४१९६ ३०१. विषय : विद्यादेवी प्रशालेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.मी विद्यादेबी प्रशालेची विद्यार्थी प्रतिनिधी असून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची विनंती करण्यासाठी आपणास हे पत्र लिहीत आहे.
आपणांस ठाऊकच आहे की, आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी हे शेतकर्यांची मुले आहेत. अलीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी खूपच वाढल्या आहेत. गरिबी, अज्ञान व आरोग्याविषयी अनास्था यांमुळे प्रकृतीची हेळसांडच होते. आपण आमच्या शाळेत आरोग्य तपासणीचे शिबिर घेतलेत आणि आरोग्याविषयी आम्हांला मार्गदर्शन केलेत, तर आम्हांला खूपच फायदा होईल.
आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी गरीब असल्यामुळे आपण ही तपासणी मोफत करावी, अशी विनंती आहे. आपली नम्र विद्यार्थी , विद्यार्थी प्रतिनिधी1. शाळेच्या भोवताली फेरीवाल्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत असल्याचा तक्रार अर्ज तयार करा.
कुमारी आर्या म. आमरे विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय, कोथरूड, पुणे-४११ ०३९. दि. १० सप्टेंबर २०२१प्रति,
माननीय पोलीस अधीक्षक,
कोथरूड पोलीस स्टेशन,
कोथरूड, पुणे - ४११ ०३९.
विषय : शाळेभोवती होणारी फेरीवाल्यांची गर्दी हटवणे.
मी-आर्या आमरे शारदा विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे.
कोथरूडच्या शिवाजी चौकात आमची प्रशाला आहे. आमच्या या शाळेजवळ नेहमीच फेरीवाल्यांची गर्दी असते. विशेषत: सकाळी शाळा भरण्यापूर्वी, शाळा सुटण्याच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत फेरीवाल्यांची गर्दी वाढते. त्यामुळे शाळेत प्रवेश करताना, बाहेर पडताना त्रास होतो. रस्ता ओलांडताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. इतरही वेळी ते विक्रीसाठी आरडाओरडा करतात. कधी कधी त्यांची आपापसात भांडणेही होतात. यांमुळे वर्गात अध्ययन-अध्यापनात खूप अडथळे येतात.
कृपया आपण यांत लक्ष घालून शाळेला होणारा त्रास दूर करावा, ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.
आपली कृपाभिलाषी, विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय.2. रस्त्यावरील कचरापेटीची दुर्दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना पत्र लिहून कळवत आहे.